Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

श्री साई मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते आरती

पिंपरी : नवी सांगवीतील ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्र परिवार यांच्यावतीने श्री साई मंदिराच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त साई चौकातील साईंची व श्री महालक्ष्मी मंदिरात महाआरती शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली.
साई मंदिराचा वर्धापनदिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या घटत्या प्रादुर्भावामुळे यंदा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शिवाजी पाडुळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेविका सीमा चौगुले, महालक्ष्मी ट्रस्टचे सेक्रेटरी रावसाहेब चौघुले, अध्यक्ष उद्धव पटेल, नगरसेविका चंदाताई लोखंडे, माजी महापौर शकुंतलाताई धराडे, युवा नेते शामभाऊ जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, युवा नेते तानाजी जवळकर, सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल, सामाजिक कार्यकर्त्या श्वेता इंगळे, युवा नेते प्रशांत सपकाळ , युवा नेते सागर परदेशी, अशोक दुर्गुळे, पवन साळुंखे, बाळासाहेब पिल्लेवार, नवी सांगवी, पिंपळे गुरव, जुनी सांगवी परिसरातील साईभक्त नागरिक व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या कार्याची खासदार अमोल कोल्हे यांनी स्तुती केली. तसेच आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन खासदार कोल्हे यांनी केले.

खासदार अमोल कोल्हे येणार असल्याने युवा वर्गात मोठी उत्सुकता होती. त्यामुळे युवा वर्गाने खासदार कोल्हे यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे यांनी, स्वागत व आभार नगरसेवक नवनाथ जगताप यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading