Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

निवासी मिळकतींना निवासी दरानेच कर आकारणी

पुणे : शहरात अनेक ठिकाणी निवासी मिळकतींना व्यावसायिक दराने आकारल्या जाणार्या कराऐवजी निवासी दरानेच कर आकारण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, निवासी जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असेल तर व्यावसायिक दराने कर आकारणी करणे योग्य आहे. परंतु त्या जागेचा निवासी वापर होत असेल तर निवासी दरानेच कर आकारणी करण्यात येणार आहे. अभय योजनेत अशा प्रकारे व्यावसायिक दराने कर आकारणी झालेल्या निवासी मिळकतींना सवलत देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading