‘डायकिन’कडून फ्युचर रेडी स्प्लिट रुम एसी रेंज सादर
नवनीत शर्मा म्हणाले, “ग्राहकांचा हवेचा दर्जा आणि आरोग्यावर अधिक भर असतो. त्यामुळे आम्ही पेटंटेड स्टीमर डिस्चार्ज तंत्रज्ञान ४-स्टार सेगमेन्टमध्ये आणले आहे. तसेच वाय-फाय असलेल्या उत्पादनांच्या ऑफर्स अपग्रेड केल्या आहेत. ड्यू क्लीन तंत्रज्ञानासह उत्पादनात आधुनिकीकरण द्वारे शुद्ध हवा देण्याची बांधिलकी आम्ही जपली आहे. हे तंत्रज्ञान इनडोअर युनिट (आडीयू) वातावरणातील पाण्याने स्वंय-स्वच्छता करण्यासाठी सक्षम करून स्वच्छ आणि कार्यक्षम संचालनाची खात्री करते. १५० चौरस फुटांच्या जागेचा विचार करून डायकिन वातानुकूलकांची (एसी) ही नवीन श्रेणी प्रत्येक सामान्य माणसासाच्या वातानुकूलनाच्या आणि हवेच्या दर्जाचा गरजा पूर्ण करते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात व्यापक विद्युतीकरण झाल्यामुळे पर्यावरणपूरक वातानुकूलन (एसी) उपायांचा लाभ घेण्यासाठी, डायकिन एसी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.”
“डायकिन इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के. जे. जावा यांच्या नेतृत्वात कंपनी प्रगतीची शिखरे गाठत आहे. येथे प्रत्येक भारतीयाची गरज पुरवणारी ‘मेक इन इंडिया’ उत्पादने तयार करण्याचे आमचे स्वप्न आहे. वातानुकूलित ही आता एक गरज बनल्यामुळे उदयोन्मुख ग्राहकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, उत्पादन नवकल्पना आणि गुणवत्ता यांच्यामध्ये एक मूलगामी बदल गरज होती. डायकिन वातानुकूलकांची नवीन श्रेणी अधिक ऊर्जा वापर शुल्काच्या भुर्दंडाशिवाय जुन्यापुराण्या, कालबाह्य तंत्रज्ञानाकडून अद्ययावत करण्यासाठी वाढत्या भारतीय लोकसंख्येला सक्षम करील,” असे नीरज शुक्ला यांनी सांगितले.
– १५% अधिक ऊर्जा कार्यक्षम
– स्वच्छ आणि कार्यक्षम आयडीयु ऑपरेशन साठी ड्यू क्लीन तंत्रज्ञान
– गरम आणि थंड होण्यासाठी कमी खर्चाचा हिट पंप
