महापालिकेच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त छायाचित्र, हस्तचित्र प्रदर्शन
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त छायाचित्र / हस्तचित्र प्रदर्शनाचे उदघाटन पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ व उपमहापौर सुनिताताई परशुराम वाडेकर यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे पार पडले.याप्रसंगी सर्व पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, आज पुणे महानगरपालिकेच्या 72 वर्धापन दिनानिमित्त
छायाचित्र हस्तचित्र चे प्रदर्शन पुणे महानगरपालिकेने भरवले आहे. महानगरपालिका दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतो. तसेच आज आम्ही
महानगरपालिकेच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त छायाचित्र / हस्तचित्र प्रदर्शन आम्ही भरवले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी हे प्रदर्शन बघावे असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
