लावण्या ला न्याय मिळेपर्यंत लढण्यासाठी अभाविप कटीबद्ध
पुणे: तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील सेक्रेड स्कूल मध्ये शिकत असलेल्या लावण्या ला धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पाडले. लावण्या ला न्याय मिळावा, आणि जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराविरोधात कायदा काढण्यात यावा यासाठी अभाविप चे सातत्याने प्रयत्न चालले आहेत. काल अभाविप च्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी तमिळनाडू येथे आंदोलन करत असताना, तमिळनाडू पोलीसांनी त्यांना अटक केली.
लावण्या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला, तर या आदेशाविरोधात तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या या कृत्यावरून त्यांची असंवेदनशीलता तसेच हे प्रकरण दडपून ठेवण्याचे चाललेले त्यांचे आटोकाट प्रयत्न चांगलेच लक्षात येत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून, उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे प्रकरण सीबीआय कडे सोपविण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लावण्याला न्याय नक्की मिळेल याबाबत आशा निर्माण होत आहे.
लावण्याला न्याय मिळावा आणि या जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराविरोधात कायदा करावा यासाठी अभाविप सातत्याने संघर्ष करत आहे. परंतु, तमिळनाडू सरकार आणि प्रशासन लावण्याच्या आत्महत्येचे प्रकरण दडपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काल लावण्याला न्याय मिळावा म्हणून अभाविप चे कार्यकर्ते तमिळनाडू चे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या घरासमोर शांततेत निदर्शने करत असताना तमिळनाडू पोलीसांनी त्यांच्यासोबत गैरव्यवहार करून अभाविप च्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी राष्ट्रीय मंत्री मुथू रामलिंगम तसेच इतर उपस्थित कार्यकर्त्यांना जबरदस्ती अटक केली.
या सर्व प्रकरणात तमिळनाडू सरकारच्या असंवेदनशीलतेच्या विरोधात आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांना गैरव्यवहार करून अटक केल्याच्या विरोधात अभाविप निषेध व्यक्त करत आहे. यावेळी प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे महानगर मंत्री शुभंकर बाचल व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
