Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

उद्योजक दिपक सपके यांच्या वाढदिवसानिमित्त मातृछाया बालकाश्रमाला खाऊ वाटप

पुणे :Ds ग्रुप महाराष्ट्र राज्य व सामजिक विकास संघटना अध्यक्ष दिपक भाऊ सपके यांच्या वाढदिवसानिमित्त मातृछाया बालकाश्रम दिघी पुणे येथे गॅलकसी ग्रुप यांच्या सौजन्याने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
दिघी येथील मातृछाया बालकाश्रम ची स्थापना 2010 रोजी झाली असून अनाथ मुलांना येथे शिक्षण, हेल्थ सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात अशी माहिती मातृछाया बालकाश्रमाचे आनंद उद्धव गाटे यांनी दिली
समाजात अनेक वाढदिवसांचे आयोजन होत असते परंतु समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून दिपक भाऊ सपके यांचा वाढदिवस गॅलकसी ग्रुपच्या वतीने मुलांना खाऊवाटप करून करण्यात आला याचा नक्कीच अनेक लोक अवलंब करतील व अनाथ मुलांबरोबर वाढदिवस करतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी दिपक  सपके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या .
यावेळी मुलांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिल्या .
मातृछाया बालकाश्रम दिघी येथील खाऊवाटप कार्यक्रमाला सचिन सपके देखील उवस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की दिपक भाऊ सपके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून केला जातो विविध संघटना ,मित्रपरिवार सामाजिक काम करून त्यांचा वाढदिवस करीत असतात आणि भविष्यात अनेक समाजोपयोगी कामे करण्याचा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला .
मातृछाया बालकाश्रम दिघी येथील दिपक भाऊ सपके यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ वाटपाच्या वेळी गलकसी ग्रुपचे आदित्य कुलकर्णी ,समीर भैय्या शेख, अतुल कोळी ,बंटी दिघे ,दादा गौरव भट ,असजद मुल्ला ,तेजस धुमाळ ,फरदीन मोमीन व मोठ्या प्रमाणावर सचिन भाऊ सपके मित्रपरिवार उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading