Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

केंद्रीय यंत्रणांचा सातत्याने गैरवापर होत आहे – खासदार सुप्रिया सुळे

पुणे : राज्यात केंद्रीय गृह यंत्रणा महा विकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या चौकश्या करत आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,विरोधात असलात की तुम्हाला नोटीस येतात.भाजपमध्ये गेलात की त्या नोटीस विरघळतात हा प्रश्न पडतो. पार्लमेंट मध्ये ही मी बोलले आहे.सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. असे खासदार सुप्रिया सुळे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.

छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी  वैयक्तिक त्यांच्याशी बोलेन.त्यांच्या काय वेदना आहेत. किंबहुना यावर सगळ्यांनीच बोललं पाहिजे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर 307 कलम नुसार गुन्हा दाखल केला नाही. व अमिताभ गुप्ता हे ठाकरे सरकारचे एजंट आहेत. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,गृहमंत्री सविस्तर बोलतील. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

किरीट सोमय्या यांच्या सत्काराला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली त्यादिवशी त्यामुळे महापालिकेत सामान्य माणसांची कामे असणारी अडकली. त्यामुळे विरोधी पक्षांनी किरीट सोमय्या यांच्या सत्काराला विरोध दर्शवला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,अतिशय दुर्देवी आहे, देशात सिस्टीम आहे ना, हा नवीन ट्रेंड आलाय.महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading