Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मानखुर्द घरकुल घोटाळ्यात पश्चिम बंगाल मधून एका आरोपीला अटक

मुंबई : मानखुर्द येथील घरकुल घोटाळ्यात ट्रोमबे पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून एका आरोपाला अटक केली आहे. बॅनर्जी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुमारे तीन कोटी रुपये घेऊन हा आरोपी फरार झाला होता,

या घोटाळ्यातील एक आरोपी सदाशिव मोरे याला अटक केल्यानंतर चौकशीत बॅनर्जी याचे नाव पुढे आले होते. पोलिसांनी याच्या मुंबईतील घराची माहिती घेऊन धाड टाकली असता बॅनर्जी हा कोलकाता येथे पळून गेल्याचे समजले. त्यानुसार ट्रोमबे पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक ऋषीकेश बाबर व त्यांच्या टीमने कोलकाता येथे जाऊन आरोपी बॅनर्जी याला अटक करून मुंबईत आणले. या प्रकरणात अटक करण्यात आलेला हा पाचवा आरोपी आहे. तर मधुकर कांबळे यांनी या पूर्वीच अटक पूर्व जामीन घेतला आहे.

गु र क 170/2019 कलम 420,409,34 भा द वि या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे अरिंदम बॅनर्जी याचा न्यू अलीपुर, कोलकाता या ठिकानी तांत्रिक तपासाचे मदतीने व सदर परिसरात चौकशी करून कसून शोध घेऊन त्यास F/5, 1, दुर्गापूर कॉलनी, न्यू अलीपुर, अलीपुर रोड, कोलकाता या ठिकाणाहून अटक करण्यात आली. अटक आरोपीस आज रोजी LT. CGM 24 PARGNAS ALIPOR POLICE COURT, KOLKATA यांचे समक्ष हजर करून त्यास मुंबई येथे आणण्यात आले. पोलीस कोठडी दरम्यान कसून तपास करण्यात आला असून सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
पो उ नि ऋषिकेश बाबर,
पो शी देशमुख

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading