संभाजीराजे यांच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा -चंद्रकांत पाटील
पुणे: छत्रपती संभाजीराजे येत्या 26 तारखेपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणार आहेत. देवेंद्र फडणीस यांनी सत्तेत असताना या गोष्टी मराठा समाजाला दिल्या होत्या. भाजपने मराठा समाजासाठी दोन वर्षात सातशे पंचवीस कोटी रुपये दिले होते. मराठा समाजाला आरक्षण कधी द्यायचे हे सरकारलाच माहित आहे. भारतीय जनता पार्टी संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहे. संभाजीराजे यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी सदैव पाठीशी उभी राहील. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी आज विविध मुद्यांवर भाष्य केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भाजपचे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत .असे म्हणत आहेत त्यावर मी काय बोलून उपयोग त्यावर त्यांनी काहीतरी बोलले पाहिजे नंतर मी माझी प्रतिक्रिया देईन .असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मी दोन दिवसानंतर दिल्लीत एका लग्नाला जाणार आहे तिथे संजय राऊत येणार आहेत त्यांच्याशी मी याबाबत सविस्तर बोलेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
केंद्रीय गृह यंत्रणा ने मुंबईत एका पॉलिटिकल जवळचे नातेवाईका वर आज कारवाई केली. आहे त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यावर आम्ही केंद्रीय गृह यंत्रणांना कारवाई करायला सांगत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या राज्यघटनेनुसार आमचे सरकार काम करत आहे. ज्या नेत्यांनी घोटाळे केले आहेत त्यांना आत्तापर्यंत जेल मध्ये जावे लागले आहे.
किरीट सोमय्या यांच्या सत्काराला गर्दी केल्याप्रकरणी भाजपच्या तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या वर हल्ला केला. किरीट सोमय्या यांच्या डोक्याला जबर मार लागला असता. त्या प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची लगेच सुटका झाली. मग त्यांच्यावर 307 कलम ने गुन्हा दाखल का झाला नाही. असा ही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
