तृणमूल नेत्या ममताजींनी विनाकारण काँग्रेसला तथ्यहीन दूषणे देऊ नये – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : २०१४ व १९ च्या लोकसभा निवडणुकीत देशवासीयांनी कॉंग्रेसला ‘दूसऱ्या क्रमांकाची’ मते दिली असून, भाजप नंतर दोन्ही वेळी सर्वाधिक खासदार असलेला “द्वितीय क्रमांकाचा विरोधीपक्ष” हा काँग्रेस’च् असल्याची सत्यता डोळेझाक करून चालणार नाही व या दोन्ही निवडणुका सोनियाजी व राहुलजी यांचेच् नेतृत्वा खाली झाल्याचे वास्तव नाकारू कसे शकता ? असे प्रतिपादन करून, देशवासीयांच्या “लोकशाहीरूपी निर्णयाची” पंप्र मोदीं बरोबरच् ममता बॅनर्जीं कडून देखील काँग्रेस ची विनाकारण अवहेलना होत असल्याचा प्रकार निंद्य असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केले!
तसेच् तृणमूल नेत्या मा ममताजींनी काँग्रेस ला तथ्यहीन दूषणे देऊन, नाहक युपीए मध्ये बिघाडी करू नये असे आवाहन देखील केले..! ‘देशाची साधन संपत्ती, सार्व. ऊपक्रम व संविधानाची पायमल्ली’ होऊ नये या करीता काँग्रेसचे युवा नेतृत्व राहूलजी सतत संघर्षशील असून, काँग्रेस सतत प्रयत्नशील आहे व त्याचाच भाग म्हणून पुरोगामी महाराष्ट्रात ‘सेना व राकाँ सोबत महाविकास आघाडी’ कार्यरत आहे… किंबहुना देशाची संघ राज्य व्यवस्थेवर मा ममताजी बोलल्या त्याच संघराज्य विषयी राहूलजी संसदेत सर्व प्रथम बदलल्याचे स्मरण देखील सर्व युपीए घटक पक्षांना हवे..! प्रादेशिक घटक पक्षांच्या सुयोग्य समन्वयामुळेच काँग्रेस प्रणीत युपीए ने १० वर्षे यशस्वी प्रगतीशील सरकार देशास दिल्याचे ममताजींनी किमान मान्य केले पाहीजे असे तिवारी यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जींच्या भूमिकेमुळे मोदी-शहा प्रणीत भाजपच्या एकप्रकारे देशातील ‘लोकशाही विरोधी अजेंड्यास’ खत पाणी घातले जाऊन, त्यातून देश विधातक व लोकशाही विरोधी शक्तींचाच फायदा होईल, याचे राजकीय भान देखील ममता बॅनर्जी यांनी ठेवणे आवश्यक आहे.. मोदीशहांच्या कट कारस्थानांना ममताजींनी बळी पडू नये.. त्यांचेकडे एक जबाबदार, प्रगल्भ व युपीए घटक पक्षाच्या आदरणीय नेत्या म्हणून बधीतले जाते…याचे भान देखील त्यांनी राखणे गरजेचे आहे.. अन्यथा युपीए घटक पक्षांत मतभेद होण्याच्या दृष्टीने त्यांची ऊथळ वक्तव्ये कशी काय होऊ शकतात..? असा गंभीर सवाल देखील केला…!
या मागे ‘पॅगासेस गुप्तहेर तंत्रज्ञानाचा गैरवापर तर होत नाही ना(?)’, असा संशय देखील येतो.. अन्यथा आजतागायत सांमजस्याची, प्रगल्भतेची व देशहिताची भूमिका घेणाऱ्या ममताजीं कडून हे अपेक्षीत नाही असे देखील गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.
