किरीट सोमय्या यांच्या बद्दल विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मी सगळीकडचा राडारोडा साफ करायला आलो आहे
पुणे : मागील आठवड्यात किरीट सोमय्या यांच्यासोबत पुणे महानगरपालिकेत धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर यावरून मोठे राजकारण रंगलं होत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा केला होता. सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी पणे कोविड सेंटर मध्ये घोटाळा केला असा आरोप केला. आज किरीट सोमय्या यांच्या प्रश्नावर मी सगळीकडचा राडा रोडा साफ करायला आलो आहे असे उत्तर शिवसेनेचे नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्याची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, पर्यावरण वातावरण निर्माण झालं पाहिजे. महिन्याला 10 हजार टन गाळ काढला आहे.स्थानिक नागरिकांनी स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी. दररोज कोन राडारोडा टाकतो.ज्याने कोणी गाळ टाकलाय त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
त्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याच काम सुरू आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पुण्यात पर्यावरण वातावरण निर्माण झालं पाहिजे . स्थानिक नागरिकांनी स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी. स्पेलिंग पक्षी अभयारण्याच तीन टप्प्यात काम केलं जाईल. असे आश्वासन सुद्धा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. गोवा विधानसभा च्या मतदानासाठी 24 तास शिल्लक आहेत . त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, आपण इथल्या पर्यावरणावर बोलूयात.
