किरीट सोमय्या हल्ला प्रकरण एक अपघात असू शकतो- छगन भुजबळ
पुणे: किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला घडवून आणला असा आरोप केला आहे. त्यावर सोमय्या जे आरोप करतात मुख्यमंत्र्यांवर की हे त्यांनी घडून आणलं. रोज काय काय तर बोलत असतात पुणे महापालिकेत घडलेली घटना हा एक अपघात असू शकतो. असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात व्यक्त केले.
छगन भुजबळ हे आज पुण्यात एका बैठकीला आल्या तर त्यांनी पत्रकार सोबत विविध मुद्यांवर भाष्य केले. राज्य सरकारने किराणा स्टोअर मध्ये व मॉल मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे त्यावर विरोधी पक्षानी टीका केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत . त्यावर छगन भुजबळ म्हणाले, आम्ही आमच्या सचिवा सोबत चर्चा केली असून. ते पुढचा निर्णय याबाबत घेतील. असे छगन भुजबळ म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रोज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच सरकार 10 मार्च नंतर पडेल असे सांगत आहे. त्यावर छगन भुजबळ म्हणाले,आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते पाटील कधीपासून भविष्य सांगायला लागले.मला तर आश्चर्य वाटत आहे. अशी टीका छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
