Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

किरीट सोमय्या यांच्या सत्काराला गर्दी केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुणे : परवानगी दिली नसताना देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमवत गोंधळ घातला तसेच महापालिका साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक होळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे, पदाधिकारी बापू मानकर, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा यांच्यासह अडीचशे ते तीनशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पालिकेत माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर शहर भाजपच्या वतीने शनिवारी किरीट सोमय्या यांचा पुणे महानगरपालिकेत त्याच ठिकाणी सत्कार करण्यात आला.
दरम्यान या सत्कार कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी मर्यादित लोकांच्या उपस्थिती राखून कार्यक्रम करण्यात यावा अशा सूचना केली होती. परंतु याठिकाणी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीत पोलिसांना किरकोळ इजा झाली. तर काही पोलिसांच्या ड्रेसवरील नेमप्लेट या धक्काबुक्कीत तुटून पडल्या. तसेच तुफान गोंधळ देखील घातला गेला. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading