Sunday, July 19, 2026
Latest NewsPUNE

भाजपा कायदा आघाडी : चेतन मोरे उपाध्यक्षपदी तर ॲड. अविनाश भाडळे यांची जिल्हासचिव पदी निवड

पुणे : लोणीकंद गावातील युवा कार्यकर्ते ॲड. चेतन मोरे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडीच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. तसेच कोलवडी गावातील कायद्याचा अभ्यास असणारे ॲड. अविनाश भाडळे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडीच्या सचिव(सेक्रेटरी) पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रदिप कंद संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी भाजपा ॲड. संजय सावंत पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. नुकताच वाघोली, मांजरी दौरा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पार पडला या कार्यक्रम व्दारे संघटना बांधनी मोठ्या प्रमाणात करण्यात आली..तसेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यात आले. पुणे महानगरपालिका आपल्याला बहुमताने जनतेच्या आशिर्वादाने जिंकायचीच अशा विश्वास पदाधिकारीना दिला.

यावेळी कार्यक्रम प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालींदर कामठे जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेद्र खांडरे, भाजपाचे राज्य कार्यकारी सदस्य रोहिदासशेठ उंद्रे हवेली तालुका अध्यक्ष संदिप भोंडवे, राजेश पांडे, युवा मोर्चा सचिव गणेश कुटे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, लोणीकंद गावचे मा. उपसरपंच रविंद्र कंद, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा गणेश सातव, हवेली जिल्हा सरचिटणीस संदिप सातव, हवेली अध्यक्ष युवा मोर्चा अनिलसातव, तालुका सरचिटणीस विजय जाचक, शिवाजीराव गोते, तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा गोरख सातव, तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading