Saturday, July 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महाविकास आघाडी सरकारची भाजप कार्यकर्त्यांवर सूडबुध्दीने कारवाई – जगदीश मुळीक

पुणे  : भाजप कार्यकर्त्यांवर महविकास आघाडी सरकारने सूडबुध्दीतून कारवाई केल्याची टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जंबो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने सोमय्या यांचा महापालिकेत सत्कार केला. या वेळी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. आज कार्यक्रमात सहभागी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यानंतर मुळीक यांनी प्रतिक्रिया दिली.

मुळीक पुढे म्हणाले,’महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकर्त्यांवर सुडाच्या भावनेतून कारवाई केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने विविध आंदोलने आणि मोठा जमाव जमवून जाहीर कार्यक्रम केले. परंतु त्यांचावर कारवाई करण्यात आली नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर महापालिकेत प्राणघातक हल्ला करण्यात आला. परंतु गुन्हेगारांवर सौम्य कलमे लावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरल्याने सुडाच्या भावनेतून कारवाई करीत आहे. पुणे पोलिस सरकारच्या दबावाखाली आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. सरकारचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सातत्याने जनतेसमोर आणू. पुणेकर जनता या सरकारला नक्की धडा शिकवेल.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading