Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मी एक सामान्य माणूस भुजबळ माझी का दखल घेत आहेत – चंद्रकांत पाटील

पुणे : भाजपचे नेते व चंद्रकांत पाटील हे रोज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच सरकार 10 मार्च नंतर पडेल असे सांगत आहे. त्यावर छगन भुजबळ आज म्हणाले,आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते पाटील कधीपासून भविष्य सांगायला लागले.मला तर आश्चर्य वाटत आहे.अशी टीका छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. त्यावर तुम्हाला वाटते सरकार टिकणार आहे .तर टिकणार आहे. मी कोण बोलणारा  मी चंद्रकांत पाटील एक सामान्य माणूस आहे . माझी का दखल घेत आहे .असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांना लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी आज विविध मुद्द्यांवर संवाद साधला . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे .असे बोलत आहेत. त्यावर पाटील म्हणाले, नाना पटोले मनोरुग्णाचे डॉक्टर झाले आहेत. त्यांनी काँग्रेस प्रदेश पदाचा राजीनामा देऊन डॉक्टरची प्रॅक्टीस चालू करावी. असा सला चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना दिला.

परवानगी दिली असताना देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमवत गोंधळ घातला तसेच पोलीस साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह तीनशे जणांवर गुन्हा शिवाजी नगर पोलिस स्टेशन मधे दाखल झाला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,
घाबरत नाही कोणाला आम्ही किरीट सोमय्या हे सत्य परिस्थिती मांडण्यासाठी पुणे महानगरपालिकेत आले होते .त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला.307 कलमानुसार पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. पण तो केला नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading