Saturday, July 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राहुल बजाज यांनी औद्योगीक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये यांनी आपला ठसा उमटवला – शरद पवार


पुणे:भारतातील प्रसिध्द उद्यगोपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले.त्याच्या निधनामुळे विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वेद मान्यवरांच्या प्रतिक्रिया पण येत आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पण प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, राहुल बजाज यांचे देशाच्या स्वांतत्यानंतर उद्योग उभारणीत अनेकांचं योगदान आहे.अनेक पिढ्यांनी आधुनिक दृष्टिकोन ठेवून उद्योगाचा पाया घातला .त्यात मुख्य नाव म्हणजे राहुल बजाज यांनीऔद्योगीक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये यांनी आपला ठसा उमटवला.असे बोलून शरद पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली.

शरद पवार म्हणाले,त्यांनी ठरवलं की सगळे मुंबईत बसून उद्योग करतात पण त्यांनी त्याला मोडत घालत पिंपरी येथून आपल्या उद्योगाची सुरवात करत यशस्वी झाले .त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून पाठवताना आम्ही प्रस्ताव एकमताने  सहमती दर्शविली अश्या जुन्या आठवणी काढून शरद पवार यांनी राहुल बजाज यांच्याविषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
त्यांनी राज्य सरकारच्या मदतीने मोठ काम केलं उद्योजक आपली मत मांडताना राजकीय पक्षाला लक्षत घेवून बोलतात पण राहुल बजाज आपल मत स्पष्टपणे मांडत होते असा त्यांचा स्वभाव होता
उद्योजक आपली मत मांडताना राजकीय पक्षाला लक्षत घेवून बोलतात पण राहुल बजाज आपल मत स्पष्टपणे मांडत होते. असा त्यांचा स्वभाव होता. असे शरद पवार म्हणाले
शरद पवार यांनी राहुल बजाज यांच्या राजकारण विषयी पण जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार म्हणाले ,युवक काँग्रेस मध्ये असताना रामकृष्ण बजाज हे देशाच्या युवक काँग्रेस मध्ये होते.
मी रोज त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचो.त्यांची आठवण आमच्या मनात कायम राहील. मित्राला नेहमी वाटतं की त्याचा मित्र पंतप्रधान व्हावा त्यांची देखील अशीच भावना होती. असे बोलून शरद पवार यांनी राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading