Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

पूर्वाचं लग्न निर्विघ्न पार पडणार का?

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेला पहिल्या पर्वापासून प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे आणि म्हणूनच या मालिकेचं प्रेक्षकांच्या भेटीस आलेलं ३ पर्व देखील लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं कि पूर्वाचं लग्न पुन्हा लावून देण्यासाठी अभिराम प्रयत्न करतोय. त्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश देखील आलं आहे. पूर्वाच्या सासरकडून लग्नाचा होकार येतो. त्यामुळे वाड्यात सगळे लग्नाच्या तयारीला लागतात पण वच्छीला त्याचवेळी हसणारे अण्णा दिसतात. तिला लग्नकार्यात काहीतरी अशुभ घडेल, याची कुणकुण लागते. अभिराम ठामपणे घरच्यांना सांगतो काळजी करू नका काहीही झालं तरी लग्न नीट पार पाडण्याची जबाबदारी मी आणि कावेरी घेतो. पण सयाजी आणि कावेरी अण्णा – शेवंताच्या तावडीतून सुटण्यापेक्षा अधिकच त्यांच्या कात्रीत अडकत असताना हे लग्न निर्विघ्न पार पडेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading