पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या
अपमानजक विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे: लोकसभेतल्या भाषनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या छत्रपती शिवरायांनी जात,धर्म,प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेत स्वराज्याची स्थापना केली. अशा या महाराष्ट्र प्रांताबद्दल बेताल वक्त्यव केले होते. त्त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलन केले.
हे आंदोलन पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,SSPMS कॉलेज बाहेर शिवाजीनगर येथे करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
या आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
महाराष्ट्र बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजलक्ष्मी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रदेश प्रवक्ते, प्रदीप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्षा ृणाल वाणी, अशोक खांदवे,महेश हांडे,किशोर कांबळे,गणेश नलावडे,अजिंक्य पालकर,मनोज पाचपुते पुणे महानगर पालिकेतील नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले,निवडणूका या डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य आहे महाराष्ट्राचा अपमान करणारे आहे. या वक्तव्यामुळे
महाराष्ट्रात वाद निर्माण होऊ शकतो. याचा फटका हा नक्की देणार या निवडणुकीत भाजपला बसणार आहे. पंतप्रधान राज्यात किंवा इतर कुठल्या ठिकाणी असताना त्यांनी असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. म्हणून आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करत आहोत. असे प्रशांत जगताप म्हणाले.
