Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएल कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी ६ कोटी ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाला यश

पुणे : पुणे महानगर परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा; या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पी.एम.पी.एल कामगार युनियनच्या वतीने पुणे महानगरपालिकेस घेराव घालण्यात आला होता. तसेच वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाला आज यश मिळाले आहे. स्थायी समितीच्या वतीने पीएमपीएल कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी ६ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ म्हणाल्या, पुणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या प्रमाणे पीएमपीएल कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा, ही ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीमधील सदस्यांनी ठराव दिला. त्यानुसार स्थायी समितीने कामगारांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी ६ कोटी रुपये दिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading