Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : शरद पवारांना चौकशी आयोगाकडून समन्स 

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्यात आला आहे. मात्र चौकशी आयोगाचं कामकाज सुरूच आहे. या आयोगातर्फे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आयोगापुढे हजार राहणार असून आपली साक्ष नोंदवणार आहेत.

या पार्श्वभूमीवर 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीचं कामकाज पुण्याऐवजी मुंबईत होणार आहे. दरम्यान यापूर्वी 4 एप्रिलला शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव ते या सुनावणीला हजर राहू शकले नव्हते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading