धक्कादायक : एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस
पुणे : एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर परीचयातीलच एका नराधमाने बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. या घटने नंतर सदर पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून; सोनू उर्फ सिद्राम ज्ञानेश्वर भालेराव (वय 25) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. कामा निमित्त ते येथे वास्तव्यास आहेत. वडील मोलमजुरी करतात तर आई घरकाम करते. काही दिवसांपूर्वी पिडीत मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी तिला डॉक्टरांकडे नेले असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, तिच्याकडे चौकशी केली असता हा सर्व प्रकार समोर आला. सदर आरोपी सिद्धाराम भालेराव यांचे पीडित मुलीच्या घरी येणे जाणे आहे. एके दिवशी पिडीत अल्पवयीन मुलगी घरी भांडी घासत असताना आरोपीने तिच्या हाताला धरून बाथरूममध्ये ओढत नेले आणि रुमालाने तोंड बांधून बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
