Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पैश्यांसाठी आईनेच पोटाच्या पोराचा सौदा करून आपहरणाचा केला बनाव; पुणे पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा

पुणे : पैश्यांसाठी आईनेच पोटाच्या पोराचा सौदा करून नंतर अपहरणाचा बनाव केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोथरूड परिसरात उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांनी अतिशय तत्परतेने तपास करून चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून चार वर्षांच्या चिमूकल्याची सुखरूप सुटका केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले असल्याची तक्रार आरोपी असलेली आई प्रियंका पवार हीने पोलिसात केली होती. याबाबत पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 9 तपास पथकामार्फत तपास करत असताना बातमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार, पळवून नेलेला मुलगा एका बांगडीवाल्या मामीसोबत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून बांगडीवाली भाभी (बशीर शेख रा. जळकेवस्ती, पुणे) हिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याच वेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यामध्ये एक महिला एका मुलास घेऊन जात असल्याने दिसून आले. आरोपी शेख हिचेकडे पुन्हा कसून सखोल तपास केला असता तिनेच गुन्हा केल्याचे कबुल केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेश्मा सुतार आणि तक्रार करणारी प्रियंका पवार यांच्या संगनमत करुन चिमुकल्याचे अपहरण केले होते. हा मुलगा तुकाराम निंबळे, मावळ याच्या मध्यस्थीने पनवेलमधील चंद्रकला माळी आणि भानुदास माळी यांना एक लाख रुपयांना विकला. पोलिसांनी तात्काळ जन्नत या दोघांचा शोध घेतला. पनवेल पोलिसांशी संपर्क साधत पुढील कारवाई ठरवली. पेनवेल पोलिसांनी तात्काळ चंद्रकला माळी आणि भानुदास माळी या दोघांना ताब्यात घेत मुलांबाबत विचारपूस केली. हा मुलगा एक लाख साठ हजार रुपयांना दिपक तुकाराम म्हात्रे, रायगड यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रायगडमध्ये जात आरोपीला ताब्यात घेतलं अन् मुलाची सुटका केली.

दरम्यान, आज या आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असतान त्यांना  9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading