Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

‘सामना’ आता गल्लीतील वर्तमानपत्र झालयं – चंद्रकांत पाटील

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर ‘सामना’ वृत्तपत्रातून किरीट सोमय्या यांच्या व्यंगा वरून बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक झाले असून. त्यांनी सामानावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “सामना आता गल्लीतील वर्तमानपत्र झाला आहे. त्यामुळे गल्लीतील लोकांना खूष करण्यासाठी अशा पद्धतीचे लिखाण सामनातून होत आहे”, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

किरीट सोमय्या यांच्या हल्ल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस यंत्रणा एवढी सक्षम राहिली नाही. पोलीस यंत्रणा ही कोणाच्या दबावाखाली तरी काम करत आहे. कोणी कोणी किरीट सोमय्या यांना अडवले . त्याचे आमच्याकडे फोटोग्राफ आहेत. ते आम्ही केंद्रीय गृह यंत्रणेला पाठवले आहेत. आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लवकरात लवकर भेटणार असून. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी आम्ही त्यांना मागणी करणार आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत. त्यांच्यापर्यंत केंद्रीय गृह यंत्रणा ही लवकरात लवकर पोहोचेल व त्यांना अटक होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading