Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली – डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे : संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने अनेक दशके मंत्रमुग्ध करणाऱ्या हिंदुस्तानच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.अशी श्रद्धांजली डॉक्टर नीलम गोऱ्हे  यांनी लता ताई मंगेशकर यांना अर्पण केली.
डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या,त्या बऱ्या होवे असे वाटत असताना त्याचे दुःखद निधन झाले. आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने 20 जानेवारीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर लता ताई बरे व्हावे म्हणून महा अभिषेक केला होता.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व लता मंगेशकर यांचे
घरगुती संबंध चांगले होते. मी विधानसभा उपसभापती व शिवसेनेचे नेते या नात्याने मी लताताई मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी 2010 साली लताताई मंगेशकर यांनी लिहलेले पुस्तक प्रकाशित केले होते. त्यात वि दा सावरकर यांच्या बद्दल काय बोलले पाहिजे कविता लिहून लता मंगेशकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, व शिवसेना पक्षा कडून लताताई मंगेशकर यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading