Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्या (दि. 7) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर; मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने उद्या सोमवार दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचने नुसार, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading