Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महानगरपालिकेच्या निवडणूकित युती झाली नाही तर स्वबळावर लढु – सचिन अहिर

पुणे : मागच्या आठवड्यात पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली. आघाडी, युती होणार की नाही ह्याचा निर्णय अजून झाला नाही. प्रत्येक पक्षाने आम्ही स्वबळावर लढलो तरी एवढ्या जागा जिंकून येतील असा दावा केला आहे. त्यावर आघाडी करायची की नाही याचा निर्णय आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील. युती झाली नाही तरी आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती माजी मंत्री शिवसेनेचे पुणे शहर संपर्क प्रमुख सचिन आहिर यांनी पुण्यात दिली.

महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली कोण कुठे उमेदवार कुठल्या प्रभागात निवडायचा याची सगळ्या पक्षांकडून तयारी सुरू आहे. त्यावर सचिन आहीर म्हणाले, आम्ही कुठला उमेदवार कुठे लढवायचा यांची चाचपणी सुरू केली आहे.

पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचाराचा झाल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमाय्यांची गाडी आडवली व त्यांना घेरले. यावेळी किरीट सोमय्या हे महापालिका इमारतीच्या पायरीवर कोसळले. किरीट सोमय्या यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले . आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मला अडवण्यासाठी महापालिकेमध्ये काही गुंड पाठवले होते. असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला त्यावर किरीट सोमय्या हे किती वेळा तरी संजय राऊत यांच्यावर निवडणूक लढले आहेत. तेव्हा ते हरले आहेत.त्याना
सगळीकडे घोटाळे दिसत असतात .तुमच्या भाजपच्या नेत्यानी किती घोटाळे केले या कडे जरा लक्ष द्यावे . असा सचिन आहिर यांनी किरीट सोमय्या यांना सवाल विचारला.

पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे तरीही
किरीट सोमय्या यांनी पुणे कोविड सेंटर मध्ये घोटाळा झाला आहे. असा आरोप केला आहे त्यावर आहिर म्हणाले, आम्ही आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार आहोत या कोविड सेंटर मध्ये घोटाळा झाला आहे तो शोधून काढा. असे सचिन अहिर म्हणाले.
किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेत जाताना अडवले व गाडीच्या खाली पाडले. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यावर सचिन आहीर म्हणाले, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर आमचे चांगले लक्ष आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कोणताही धक्का बसून देणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading