Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

संगीत क्षेत्रातील दैदीप्यमान तारा निखळला – डॉ.पं.नंदकिशोर कपोते

पुणे : लता दीदींच्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. संगीत क्षेत्रातील एक दैदीप्यमान तारा निखळला आहे. पण जोपर्यंत त्यांचे गाणे आहे, तोपर्यंत लता दीदी आपल्यात सदैव रहातील, अशा शब्दात जेष्ठ कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

ते म्हणाले, माझी आणि लता दीदीं ची पहीली भेट पुण्यातच झाली. त्यावेळी माझे गुरु पं. बिरजू महाराज यांना पं. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळणार होता. महाराज मलाही सोबत घेऊन गेले. त्या वेळी सर्व मंगेशकर परिवार एकत्र जमला होता. आशा ताई, मिना ताई, उषाताई, पं.हृदयनाथ मंगेशकर . महाराज जीं नी माझी लता दीदीं ची ओळख करुन दिली.लता दीदीं ना मी महाराष्ट्रीयन आहे हे कळाल्यावर त्यांनी माझी विशेष आस्थेने चौकशी केली.मी नृत्य शिकतो हे पाहून त्यांनी माझे कौतुक केले.हे माझे अहोभाग्य होते. त्यानंतर लता दीदीं ची मुंबईत अनेक वेळा भेट झाली. ज्या ज्या वेळी त्यांना भेटलो त्या त्या वेळी दीदीं कडुन नवीन नवीन गोष्टी शिकायलाच मिळत.

पं.बिरजूमहाराज यांनी मला एक लहान पणची आठवण सांगीतली ती आठवते. महाराजजीं ना लहान पणी हिंदी गाणे म्हणायची खूप आवड. एकदा महाराजी लहान पणी मुंबई त असताना ते लता दीदीं च्या घरी गेले. त्या वेळी आशा भोसले ताई पण तेथे होत्या .महाराज जीं नी लता दीदीं नाअनेक हिंदी गाणी म्हणून दाखवली. लता दीदीं गाणी ऐकून खूप खुष झाल्या. व त्यांनी त्या काळी एक चांदीचे नाणे छोट्या महाराज जीं ना भेट दिले. महाराजजीं सांगायचे त्यांनी ते नाणे शेवट पर्यंत जपून ठेवले होते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading