Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात 1 हजार 434 नवीन कोरोना रुग्ण

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 1 हजार 434 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3896 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 51 हजार 516 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 27 हजार 866 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 9 पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9298 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 16
14352 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 234 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 7215 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading