जाणून घ्या अजित पवार यांच्या भेटीनंतर पून्हा घरवापसी करण्यावर उदयनराजे भोसले काय म्हणाले?
पुणे:आज पुण्यात सर्कीट हाऊसमध्ये अजित पवार व खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली आहे.त्यामुळे राजकिय चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार यांची भेट घेऊन आल्या नंतर त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला .उदयनराजे भोसले पून्हा घरवापसी करणार अशी चर्चा मध्यंतरी सुरू असताना उदयनराजे याना पत्रकारानी पुण्यात प्रश्न विचारलं असता ते म्हणाले .शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे एक संकल्पना मांडली होती की सर्वधर्म समभाव अस माझं म्हणणं आहे . असं यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
राज्याचे हिवाळी महिन्याअखेरीस जे अधिवेशन होणार आहे.सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.असं यावेळी उदयनराजेंनी सांगितलं आहे.
राज्य सरकारने किराना दुकान व अन्य दुकानात
वाइन विक्रीचा निर्णय घेतला त्यावर उदयनराजें म्हणाले,ही लोकशाही आहे आणि हे तुमि निवडून दिलेले प्रतिनिधी आहे जर राज्यशाही असती तर मी उत्तर दिलं असत .असे उदयन राजे म्हणाले.
