Thursday, September 17, 2026
Latest NewsPUNE

ज्येष्ठ विधिज्ञ कै. अ‍ॅड. विनायक अभ्यंकर चौकाचे नामकरण संपन्न

पुणे : ज्येष्ठ विधिज्ञ, भाजपाचे शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी अध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. अ‍ॅड. विनायक नरहर अभ्यंकर यांच्या नावाने प्रभात रस्ता गल्ली क्रमांक 3 येथील चौकाचे नामकरण माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभात रस्ता गल्ली क्रमांक 3 च्या जवळ त्यांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या चौकाला अ‍ॅड. अभ्यंकर यांचे नाव देण्यात आले. यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, नगरसेविका निलिमा खाडे, माधुरी सहस्रबुध्दे, ज्योत्स्ना एकबोटे, भाजप सरचिटणीस दत्ता खाडे, भाजप शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, माजी विरोधी पक्षनेते श्याम सातपुते, माजी नगरसेवक बाळासाहेब मोकाटे, भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्‍वस्त अ‍ॅड. सदानंद फडके, पुणे मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे, पुणे बार असोसिएशनचे अ‍ॅड, सतीश मुळीक, डॉ. अनंतभूषण रानडे, अभय आपटे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष सुनील पांडे आणि शिवाजी नगर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मिलिंद टकले यांनी केले.

यावेळी वक्त्यांनी अ‍ॅड. अभ्यंकर यांच्या सामाजिक, राजकीय, न्यायालयीन आणि कौटुंबिक आठवणींना आणि त्यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मेघना अभ्यंकर आणि देवयानी कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बगाडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading