Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

भोईटे नगर येथील नागरिकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी

पुणे : पुण्याच्या उपमहापौर सुनिताताई वाडेकर यांच्या निधि व संकल्पनेतून होळकर पाणी पुरवठा केंद्र येथे उच्च क्षमतेचा व्हार्टिकल पंप कार्यान्वित करण्यात आला आहे. या पंपाचे उदघाटन सौ.वाडेकर यांच्या शुभहस्ते सबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत होळकर पाणीपुरवठा केंद्र,खडकी येथे संपन्न झाले.
या भागातील अनेक वर्षांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी उपमहापौर सुनिता वाडेकर आणि यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा ज्वलंत प्रश्न कायमचा मार्गी लावला.
सदर पंपाच्या १२० अश्वशक्ती उर्जेमुळे ५०० घनमीटर प्रती तास पाणी पुरवठा होणार आहे.यातून पूर्वीचा त्रास मिटणार असून याचा फायदा खडकी छावणी परिषद भागातील नागरिक तसेच ज्या भागात उंचवठयामुळे पाणी पोहोचण्यास अडचण होत होती. अशा कुंदन कुशल नगर, एल्फिन्स्टन रोड,मानाजी बाग,भोईटे चाळ,येथील नागरिकांस पाणी मिळण्यासाठी होणार आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
या कार्यक्रम प्रसंगी उपमहापौर .सुनिताताई वाडेकर रीपाई नेते परशुराम वाडेकर,मुख्य अभियंता .अनिरुद्ध पावसकर, शाखा अभियंता मा.प्रसन्न जोशी,गोहाड,बडदे,औंध क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता शंकर केदारी,माजी नगरसेवक आनंद छाजेड,उपाध्यक्ष निलेश वाघमारे राजेंद्र शिंदे,रिपाई सचिव संतोष खरात,कुंदन कुशल नगरचे सचिव .मनीष बासु,जोयल अॅंथनी,खडकी रिपाई युवा अध्यक्ष रिकेश पिल्ले, रूपेश पिल्ले,सीमा आरीकस्वामी दादाराव गायकवाड,संकेत कांबळे,भोईटे नगर भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल परदेशी,सदाशिव वाघमारे माणिक गायकवाड अमित जावीर,निलेश रुपटक्के आतिष केंगार आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading