Saturday, July 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हिंदुस्तानी भाऊच्या व्हिडीओमुळे विद्यार्थी रस्त्यावर; नागपुरात आंदोलनाला हिंसक वळण

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, असे शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. या विरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’ अर्थात विकास फाटक यांच्या दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या भडकाऊ व्हिडीओ नंतर आज अचानक हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. नागपूर येथे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. येथे विद्यार्थ्यांनी बसची तोडफोड केली.

नागपूर, अकोला, औरंगाबाद आणि पुण्यासह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले आहे. यावेळी काही विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा न घेता ऑनलाईन परीक्षा घ्यावी तसेच बोर्ड परीक्षा रद्द करण्यात यावी अशा मागण्या करत होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading