Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

राज्यपाल सतत राजकीय हेतूने प्रेरीत भूमिका घेत असून त्यांच्या कृतीबद्दल भाजपने जनतेची माफी मागावी – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी  

पुणे : राज्याच्या संवैधानिक कृती व परंपरांची सतत अवहेलना करीत राजपाल भगतसिंह कोशारी आपल्या कर्तव्यांपासून पलायन करीत, सतत राजकीय हेतूने प्रेरीत भूमिका घेत आहेत. तसेच राज्याच्या मंत्री मंडळाच्या शिफारसीची पुर्ती न करता विविध समाज-घटकांचे’ प्रतिनिधींना तब्बल 1  वर्षे ‘संवैधानिक हक्कांपासून वंचित ठेवत “विधान परीषद नियुक्तीच्या” मात्र १/६ जागा ही न भरणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या कृतीबद्दल भाजप’ने राज्यातील जनतेची माफी मागावी,  अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.

त्यांनी दीलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की, ‘राज्याच्या मंत्री मंडळाने’, विधान परीषदेच्या संवैधानिक तरतूदी प्रमाणेच (१६%) विविध क्षेत्रातील प्रतीनिधींच्या नियुक्तीची एकमताने शिफारस करून देखील त्या न भरणे, मंत्रीमंडळाच्या सुचनांचा ऊपमर्द करणे, प्रशासकीय कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप करणे, ‘ठराविक सिलेब्रीटीज व नेत्यांशीच’ हितगुज साधणे मात्र लोकशाही मार्गाने येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे निवेदन ही न स्वीकारणे, असंवैधानिक व घटना विरोधी वक्तव्ये करणे इ मुळे राजकीय हेतूने प्रेरीत काम करणारे कोश्यारी हे ‘राज्यपाल कार्यालयीन’ कर्तव्ये पार पाडण्यात अपयशी ठरत असून घटनेची पायमल्ली करत आहेत.

उच्च न्यायालयाने सुचक निदर्शक वक्तव्ये करून ही त्यांची कार्यप्रणाली सुधारत नाही. या प्रकारांमुळे मुळे महाराष्ट्राची बदनामी होत असून, ‘मविआ सरकार’ला लोकाभिमूख काम करण्यात, विविध समाज घटकांचे हिताचे निर्णय घेण्यात, कायदे इ. बनवण्यात बाधा निर्माण होत आहेत’. या सर्व संकटांना राज्यपाल जबाबदार आहेत. राज्यपालांची नियुक्ती ही पंतप्रधान व केंद्रीय मंत्रीमंडळाचे शिफारसीवरूनच राष्ट्रपती करतात. त्यामुळे राज्यपाल भाजप नेतृत्वाच्या सल्ल्यावरूनच असे वागतात, हेच अधोरेखीत होते. त्यामुळे भाजप ने राज्यातील जनतेची माफी मागावी, असे प्रतिपादन गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading