संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
बहुप्रतीक्षित संजय लीला भन्साळी दिग्दर्शित व आलिया भट्ट स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटच्या प्रदर्शनासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी नुकतीच याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
अगदी कोरोनाच्या आधीपासून या चित्रपटाची चर्चा आहे. दरम्यानच्या काळात दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसह मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट आणि इतर कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे चित्रीकरणही लांबणीवर पडले होते. यापूर्वी तीन वेळा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Witness her reign in cinemas near you on 25th February 2022. 👑#GangubaiKathiawadi#SanjayLeelaBhansali @ajaydevgn @aliaa08 @prerna982 @jayantilalgada @PenMovies @saregamaglobal pic.twitter.com/SJ5myx1X3u
— BhansaliProductions (@bhansali_produc) January 28, 2022
