राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पांडुरंग वांजळे यांचा खडकवासला काँग्रेसच्या वतीने नागरि सन्मान
पुणे:राष्ट्रपती पदक विजेते ,पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथका मधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग लक्ष्मण वांजळे यांचा धायरी येथे खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते विशेष नागरि सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी च्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पोलीस दलासाठी देण्यात येणारे राष्ट्रपती पदक पांडुरंग लक्ष्मण वांजळे यांना जाहीर करण्यात आले आहे.
सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र पुस्तिका शाल श्रीफळ पुणेरी पगडी व तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार वामनराव पै विश्व संत यांच्या विश्वप्रार्थना ची प्रतिमा सन्मानचिन्ह देऊन वांजळे यांचा सत्कार करण्यात आला .याप्रसंगी खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पै राहुल मते पाटील कॉसमॉस बँकेचे संचालक मिलिंद पोकळे पाटील हवेली तालुका किसान संघटनेचे अध्यक्ष विजय बापू लगड राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस प्राध्यापक राजू मते हवेली तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रघुनाथ यादव पाटील धायरी गावचे माजी सरपंच गुलाबराव पोकळे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते पै शंकर रायकर ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे क्षत्रिय मराठा दिंडी क्रमांक 97 चे विश्वस्त इत्यादी उपस्थित होते उपस्थित होते राष्ट्रपती पदक विजेते पांडुरंग वांजळे यांनी लष्कर भरती घोटाळा उघडकीस आणून त्यांनी अनेकांना अटक केले वांजळे हे उत्कृष्ट कुस्तीगीर देखील होते अनेक राज्य स्पर्धेमध्ये त्यांनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले होते आज पर्यंत पोलीस दलामध्ये 300 हून जास्त पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे
