Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी निधी

पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत विविध विकासकामे आणि देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे ३६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शहरातील पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्याच्या अंतर्गत ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाला विकसित करणे, कल्व्हर्ट बांधणे, पावसाळी पाण्याच्या ड्रेनेज लार्इन टाकणे अशा विकासकामांचा समावेश आहे. कोथरुड, वारजे, बावधन, पाषाण, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा, मनोरुग्णालय, विमाननगर, वडगाव शेरी, हडपसर, कोंढवा, शनिवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, वडगाव, वाडिया आदी परिसरात ही विकासकामे होणार आहेत.

Leave a Reply