खळबळजनक – MPSC च्या आणखी एका विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या

पुणे ः राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची (mpsc) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने शनिवारी (दि. १५ जानेवारी) पुण्यातील सदाशिव पेठेत आत्महत्या केली आहे. अमर मोहिते असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा सांगलीचा आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडला होता, तेव्हापासून तो नैराशात होता.

दरम्यान, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आज सांगलीच्या अमर मोहिते नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो अभ्यासासाठी पुण्यात आला होता. तो पुण्यातील सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये राहत होता. मोहिते पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे पीएसआयच्या फिजिकलमधून अमर मोहिते हा बाहेर पडला होता. तेव्हापासून तो कायम स्ट्रेसमध्ये होता.

पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडल्यानंतर अमर मोहिते हा नैराशात गेला होता. त्यातच कोरोनाच्या काळात एमपीएससीची परीक्षाही अनेकदा रद्द करण्यात आली. तसेच, ती परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यातूनच नैराशात असलेल्या अमर मोहिते याने आज आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे आढळून येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: