चिंताजनक : आज दिवसभरात मुंबईत 20 हजार 971 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई : मुंबईतील कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत 20 हजार 971 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 8 हजार 490 रुग्णांना डिसचार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण 91 हजार 731 कोरोना रुग्ण अॅक्टिव आहेत.
नवीन वर्षांच्या सुरूवाती पासूनच मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येचा आलेख हा वाढता आहे.
मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येचा आलेख
1 जानेवारी – 6 हजार 347 कोरोना रुग्णांची नोंद
2 जानेवारी – 8 हजार 63 कोरोना रुग्णांची नोंद
3 जानेवारी – 8 हजार 82 कोरोना रुग्णांची नोंद
4 जानेवारी – 10 हजार 860 कोरोना रुग्णांची नोंद
5 जानेवारी – 15 हजार 166 कोरोना रुग्णांची नोंद
6 जानेवारी – 20 हजार 181 कोरोना रुग्णांची नोंद
COVID-19 | Mumbai reports 20,971 new cases, 6 deaths and 8,490 recoveries today. Active cases 91,731 pic.twitter.com/ZpBJKFum9m
— ANI (@ANI) January 7, 2022
