रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या तर आनंद, …पण – चित्रा वाघ
पुणे : रश्मी ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभला तर त्याचा महिला म्हणून निश्चित आनंद आहे .मात्र महा विकास आघाडी सरकारच्या पॅटर्ननुसार मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीला अपेक्षित अनुभव असावा. अशी टीका
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एका कार्यक्रमाला आले असता महाविकास आघाडी सरकारवर केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप-शिवसेना काही दिवसात एकत्र येऊ शकतात. असे विधान केले होते. त्यावरआमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस हे याबाबतचा निर्णय घेतात. भाजप-शिवसेना युती चा निर्णय मी घेऊ शकत नाही. असे चित्र वाघ म्हणाल्या.
महिलांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणे महिला आयोगाचं काम आहे केवळ पोस्टर काढून समाजातील विकृती थांबणार नाही असे देखील चित्रा वाघ माध्यमांशी बोलताना म्हणाल्या
