अभिनेत्री प्रेमा किरण यांनी दिला ‘दे दणा दण’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा
झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘हे तर काहीच नाय’ हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकारांनी सादर केलेले किस्से प्रेक्षकांच्या भातलेच पसंतीस पडले आहेत. प्रत्येक आठवड्यात कलाकार या मंचावर येऊन भन्नाट किस्से सांगून प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करतात. आगामी भागात अभिनेत्री प्रेमा किरण सहभागी होणार असून त्या गोल्डन जुबली ‘दे दणा दण’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले किस्से सांगणार आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या याच्याशी निगडित कुठलीही आठवण प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवते. त्यावेळी ‘पोलीसवाल्या सायकल वाल्या’ गाण्याच शूटिंग करताना काय धमाल झाली हे प्रेमा किरण ‘हे तर काहीच नाय’च्या मंचावर सगळ्यांना सांगणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका हे तर काहीच नाय शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त झी मराठीवर
