Tuesday, November 3, 2026
Latest NewsPUNE

साठीतील पॉवर लिफ्टर सहानी
यांचा काँग्रेसतर्फे सत्कार

पुणे : वयाची साठी उलटल्यावरही पॉवर लिफ्टींग क्रीडाप्रकारात आशियाई पातळीवरील स्पध र्धेत पदके मिळविणारे शाम दीनानाथ सहानी यांचा काँग्रेस पक्षाने विशेष सत्कार करण्यात आला.

तुर्कस्तानात आशियाई क्लासिक अँड इक्विप्ड पॉवर लिफ्टींग चँपियन स्पर्धेत मास्टर थ्री (साठ वर्षापुढील ) १०५ किलो वजनी गटात शाम सहानी यांनी आठ सुवर्णपदके मिळविली. या त्यांच्या कामगिरीचा गौरव व्हावा यासाठी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक रफिक शेख, पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस आणि प्रवक्ते रमेश अय्यर, प्रदेश सदस्य शानी नौशाद, ओबीसी विभाग शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, शहर चिटणीस चेतन आगरवाल उपस्थित होते.

या सत्कारामुळे मी भारावून गेलो, असे मनोगत सहानी यांनी व्यक्त केले. वयाची साठी उलटल्यावरही स्पर्धेत उतरण्याच्या सहानी यांच्या जिद्दीची आणि फिटनेसची यावेळी बोलताना मोहन जोशी यांनी प्रशंसा केली.

Leave a Reply