Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होईपर्यंत चौकशी होईपर्यंत कुलसचिवांना निलंबित करावे – अभाविप

पुणे : पुणे विद्यापीठातील कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्र-कुलगुरू यांची भेट घेतली. तसेच कुलसचिवांवर झालेल्या आरोपांची चौकशी होई पर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कडून करण्यात आली आहे.

अभाविपने दिलेल्या निवेदनात म्हटंले आहे की, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यावर झालेल्या आरोपांवर चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी. या समितीचा निकाल येत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात यावे.

याचसोबत, २६ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या सेट च्या परीक्षांचा निकाल तीन महिने उलटून गेले तरी देखील अजूनही लागलेला नाही. तरी, लवकरात लवकर संबंधित परिक्षेचा निकाल लावावा,अन्यथा अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा देत अभाविप पुणे महानगराच्या वतीने निवेदन देखील आज प्र-कुलगुरूंना देण्यात आले.

Leave a Reply