Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीने जोर धरला आहे. काड्याची थंडी असताना देखील राज्यात अधून मधून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. हवामानाच्या या बदलामुळे शेतीचे अतोनात नुकसान होता आहे. अशातच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या सहा जानेवारी पासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागात काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

राज्यात अजूनही कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे काही ठिकाणी गारपीटदेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यामुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वातवरणातील बदलांमुळे कधी काय होईल याचा नेम नाही.

Leave a Reply