एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा नारायण राणे यांनी केंद्रातून निधी आणावा – अजित पवार
बारामती : सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला अपयश आले . सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सीट जिंकून आल्या. नारायण राणे यांचे वर्चस्व बँकेवर राहिले. नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा नारायण राणे यांनी केंद्रातून निधी आणावा, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांना लगावला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत ज्यांना यश मिळाले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी ही बँक चांगली चालवावी अशा शुभेच्छा देतो.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन कोकणात आले होते, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ,आम्ही राज्याच्या माध्यमातून कोकणासाठी निधी उपलब्ध करुन देऊ. सर्वांनी मिळून कोकणचा कायापालट करु, असे ते म्हणाले.
