गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे:राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण हे वाढत आहे . 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आलेत . त्यामुळे गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार व पुण्याचे पालकमंत्री यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केले तेव्हा त्यांनी पत्रकार सोबत संवाद साधला त्या वेळी दिला.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले ,10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले. तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
कोरेगाव भीमाच्या लढाईतील शुरांना अभिवादन करतो, इथला इतिहास स्मरणात राहील. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
