fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsPUNE

विदेशी मद्यामुळे पालिकेच्या तिजोरीत गेल्या ८ दिवसात जवळ २५० कोटीची भर

पुणे : आजच्या दिवसाला सर्वत्र खास महत्व असतेच पण त्याहून खास महत्व पुण्यात आहे. एकीकडे विदेशी मद्य विक्रेते ५० टक्के उत्पादन शुल्क सूट असताना ती नाकरून तळीरामांची लुट करून माल ओरबाडत असताना पुण्याची महापालिकाहि मालामाल होते आहे. आता तुम्ही विचाराल याचा महापालिकेशी काय संबध ? निश्चितच याचा पालिकेशी संबध नसला तरी आज महापलिकेत शेकडो कोटी जमा करणारा दिवस आहे. कारण आजचा दिवस अखेरचा आहे. कशा साठी ? तर ६ मीटर चे रस्ते ९ मीटर करण्यासाठी आज शेवटची मुदत आहे सुमारे ३०० प्रस्ताव आजवर दाखल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे आणि पालिकेच्या तिजोरीत गेल्या ८ दिवसात जवळ जवळ २५० कोटीची भर पडल्याचेही सूत्रांकडून सांगितले जाते आहे .

एकूणच आजचा दिवस हा सरकारी महसुली साठी वरदान ठरतो आहे. राज्याने जरी विदेशी दारूवरील ५० टक्के उत्पादन शुल्क माफ केले असले तरी हि माफी प्रत्यक्षात विदेशी मद्य विकत घेणार्याला द्यायला मद्य विक्रेते तयार नाहीत . आणि बहुतेक मद्य विक्रीचे परवाने हे राजकीय लोकांच्या संबधितांनीच बळकावून ठेवलेले आहे . अशी स्थिती एकीकडे तर दुसरीकडे पुणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष रासने हे देखील आज अत्यंत बिझी असल्याचे समजते आहे. शहरातील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव देण्यास आजची अंतिम मुदत आहे . आज वर काही शे प्रस्ताव दाखल झालेत अजूनही होताहेत २५० कोटी पालिकेच्या तिजोरीत आलेत अजूनही येत आहेत . हे प्रस्ताव मंजूर करताना बिल्डरांना टीडीआर दिला जातो आहे. यामुळे आता महापालिका मालामाल होते आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading