fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लसीकरण केंद्र सुरु करा – नगरसेविका अर्चना पाटील

पुणे : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे मनपा हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे नियोजन केले असून या वयोगटासाठी शहरात 5 स्वतंत्र लसीकरण केंद्राचे नियोजन केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यानंतर आज भाजप नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांना निवेदन देऊन भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.

नगरसेविका अर्चना पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग 19 मध्ये पाच शाळा असून याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तसेच प्रभागामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची संख्या देखील जास्त आहे. तसेच भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शाळा न शिकणाऱ्या मुला-मुलींची संख्या देखील मोठी आहे. याशिवाय कार्यालयात वेगवेगळ्या कामासाठी दैनंदिन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ही परिस्थिती पाहता. प्रभाग 19 मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र, काशेवाडी येथे 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण केंद्र सुरु केले तर जास्तीत जास्त जणांना याचा फायदा होईल.

प्रभाग 19 मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र, काशेवाडी येथे 18 च्या वरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र असून याच ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading