Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

नव्या वर्षात सलून च्या दरात वाढ

पुणे : न्यू सलून पार्लर असोसिएशन  यांच्या वतीने सद्यस्थितीत वाढलेली महागाई कोरोना लॉक डाऊन व धरसोड अनलॉकडाऊन मुळे निर्माण झालेली महाभयानक परिस्थिती लक्षात घेता सर्व प्रकारच्या वाढीव खर्चाचा मुकाबला करण्यासाठी न्यू पार्लर असोसिएशन ऑफ भारत देश या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील सर्व सलून सेवकांच्या सेवा भावांमध्ये सेवा कलात्मक पात्रतेनुसार 1 जानेवारी 2022 पासून वाढत्या महागाईनुसार भाववाढ जाहीर करण्यात आली. 

यावेळी माहिती देताना न्यू पार्लर असोसिएशन भारत देशचे मार्गदर्शक विलासराव साळुंके म्हणाले की जुने भाव साध्या कटिंगसाठी 200 रुपये होते तर साध्या दाढीसाठी 100 रुपये होते सद्यस्थितीत वाढलेली महागाई ,कोरोना लॉकडाऊन यामुळे सलून व्यवसायिक आणि सलून सेवक पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला असून सलून क्षेत्रातील लोकांच्या व्यवसायिक खर्चात आणि कौटुंबिक खर्चात सुद्धा दिवसेंदिवस वाढचं होत आहे, या वाढत्या महागाई नुसार आणि संसर्गजन्य रोगराई रिस्क लक्षात घेता हायजीन सलून सेवांचे सुधारित भाव हे सलून सेवकांच्या कलात्मक पात्रतेनुसार असतील,
यामध्ये कुशल म्हणजेच एक्सपर्ट सलून सेवकांकडून कटिंग करून घेण्यासाठी कटिंगसाठी भाव 300 रुपये आणि वेदनारहित हायजीन शेविंगसाठी किमान भाव 150 रुपये असेल,

निमकुशल किंवा अर्धकुशल म्हणजेच सेमी एक्सपर्ट सलून सेवकांच्या हाताने कटिंग करून घेण्यासाठी हेअर कटिंगचा भाव 250 रुपये आणि हायजीन शेविंगसाठी 125 रुपये असेल,
सलून क्षेत्रात आप आपल्या परिसरात मास्टर म्हणून नावलौकिक असणाऱ्या सलून सेवकांच्या हातून हेअरकट करण्यासाठी सध्या सरासरी भाव 500 रुपयांपासून पुढे कलात्मक पात्रतेनुसार आहे आणि सलून मधील ग्राहक उपोयोगी आधुनिक सोयीसुविधा व सलून डेकोरेशन गुंतवणूक खर्च पाहता मास्टर सलून सेवकांच्या मर्जीनुसार त्यामध्ये जास्तीची वाढ ठेवण्यात आली आहे तसेच पेनलेस हायजीन शेविंग 250 रुपये आणि बेआर्ड शेपिंग आणि ट्रीमिंग साठी 300 रुपये राहतील अशी माहिती यावेळी विलासराव साळुंके यांनी दिली .

यावेळी न्यू सलून पार्लर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष संभाजी रायकर , राष्ट्रीय उपाध्यक्ष किरण काळे,मार्गदर्शक विलासराव साळुंके ,प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश कोंडामणले , पुणे शहराध्यक्ष सुरज तावरे,मार्गदर्शक बाळासाहेब तावरे,मार्गदर्शक दत्तात्रय मोरे, आमन गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते…!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading