शिक्षा बचाओ देश बचाओ स्वाक्षरी मोहीम – NSUI चा ABVP ला दणका
पुणे : शिक्षा बचाओ देश बचाओ या कार्यक्रमा अंतर्गत NSUI पुणे शहर व जिल्हा यांनी मॉडर्न महाविद्यालय बाहेर स्वाक्षरी मोहीम घेतली. याच दरम्यान ABVP च्या काही विद्यार्थ्यांनी तिथं येऊन घोषणा बाजी केली. पण NSUI च्या अवजापुढे त्यांचा काही टिकला नाही. NSUI देशभर शिक्षा बचाओ देश बचाओ माहीम घेत आहे. या मोहिमेत देशातील प्रचंड बेरोजगारी, शिक्षण क्षेत्राच होत असलेल खाजगीकरण, शिक्षणाची कमी होत चाललेल आर्थिक तरतूद, शिष्यवृत्ती मध्ये होत असलेली कपात, नवं शैक्षणिक धोरण अश्या अनेक विषय घेऊन देश भर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहे.
